जळगाव जिल्हा प्रतिनिधी(प्रमोद कोंडे) निंभोरा बु. ता. रावेर. येथे बेघर भूमिहीन नागरिकांच्या जागे विषयी, तसेच घरकुल प्रश्न सोडविण्यासाठी स्वतः निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर निंभोरा गावांत ग्रामस्थांच्या वतीने समस्या सोडविण्यासाठी हजर राहिले. परंतू निंभोरा बु. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हजर नव्हते.[ads id="ads1"]
भुमीहीन ग्रामस्थांचा घरकुल जागेविषयी प्रश्न हा दहा ते पंधरा वर्षापासुन निंभोरा गावामध्ये भेडसावत आहे. हा प्रश्न स्थानिक पातळीवर लवकरात लवकर सोडवून रहीवाशींना,जनतेला न्याय मिळावा यासाठी निळे निशाण संघटने तर्फे शरद तायडे प्रयत्न करीत आहे. [ads id="ads2"]
त्यांनी या विषयी ग्रामसेवकांना ग्रामपंचायत मध्ये निवेदनही दिले होते. हा प्रश्न सुटावा या साठी ग्रामपंचायत सदस्य मनोहर तायडे यांची ही तळमळ आहे. पण घोड कुठे अडकलं आहे हा प्रश्न आहे. आनंद भाऊ बाविस्कर यांनी निंभोरा गावाचे सरपंच सचिन महाले यांच्याशी बेघर भूमिहीन नागरिकांविषयी चर्चा केली त्यांनी सकारात्मक भुमिका घेत तीन महिन्यात घरकुल जागेविषयी समस्या सोडविण्याचे आश्वासन आनंद भाऊ बाविस्कर यांना दिले.या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अमोल खाचणे, सतिष पाटील, अकील खाटीक , निळे निशान संघटनेचे युवक तालुका अध्यक्ष विजय धनगर, तालुका सरचिटणीस सुधीर सैनगगिरे, ता.उपाध्यक्ष अनिल वाघ, कार्याध्यक्ष शरद बगाडे, वाहतूक शाखा ता.अध्यक्ष शरद तायडे,ता. उपाध्यक्ष विलास तायडे,रोहीदास तायडे,आदि निंभोरा ग्रामस्थ, महीलावर्ग उपस्थितीत होते.

