जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या वतीने जळगाव येथील महावळ परिसरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात शनिवारी आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात यवतमाळ येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अशोक राणा, वीर शहीद सोपान आमले यांच्या वीरमाता निला आमले यांच्या हस्ते श्रीराम उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांचा राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.[ads id="ads1"]
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, मनपा महापौर जयश्री महाजन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार विकास भदाणे उपस्थित होते.[ads id="ads2"]
दिलेल्या पुरस्कारासंदर्भात आभार व्यक्त केले. आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय उद्योग व आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी आयोजन केले होते.
याप्रसंगी श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशनचे संचालक प्रमोद पाटील, दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल दर्जी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राम पवार, पाटील बायो टेकचे प्रमोद पाटील, सुरेंद्र पाटील, राहुल पवार आदी उपस्थित होते.
श्रीराम पाटील यांना त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेल्या आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उद्योग व आदी क्षेत्रात कामांची ही पावतीच असल्याचे उपस्थितांनी नमूदकेले आहे.

