यावल : तालुक्यातील थोरगव्हाण येथील 65 वर्षे पत्नीचा 68 वर्षीय पतीने खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल होण्याचे कार्यवाही सुरू असून पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर मयत महिलेचा मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.[ads id="ads1"]
थोरगव्हाण ता. यावल येथील पांडुरंग पाटील यांनी रविवारी सायंकाळी आपल्या पत्नीची झालेल्या किरकोळ वादातून पत्नी इंदुबाई प्रकाश पाटील वय 65 हिच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जबर वार करीत ठार केले या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली, रक्तबंबाळ अवस्थेतील इंदुबाई पाटील यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले.[ads id="ads2"]
व तेथून पुढील उपचारासाठी जळगाव नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला दरम्यान यावल पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक फौजदार नेताजी वंजारी, सुशील घुगे, भूषण चव्हाण आदी पथकासह गावात दाखल झाले पोलिसांनी पांडुरंग पाटील यांना ताब्यात घेतले आहे पुढील कार्यवाही सुरू आहे

