रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर ते निंभोरा स्टेशन दरम्यान रेल्वे विद्युत खांब क्र.४७३/१२ ते ४७३/१४ यामध्ये दिनांक २७/0२/20२२ रोजी सकाळी ठीक ७:३० वाजेच्या पूर्वी अंदाजे ३० वर्षीय अनोळखी इसम कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने जागीच ठार झाला.[ads id="ads2"]
असून या बाबत निंभोरा पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ०२/२०२२ नुसार सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मयत इसमास कुणी ओळखत असल्यास ०२५८४-२८०३६१ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन निंभोरा पोलीस यांचे तर्फे करण्यात आले आहे.

