रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर येथील श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालयात दि.२७ फेब्रुवारी रविवार रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी गझल काव्यप्रकाराची निर्मितीप्रक्रिया या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. [ads id="ads1"]
या कार्यशाळेत प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर भुयार (बादशाह ) यांनी मार्गदर्शन केले. गझल काव्यप्रकाराचा रचनाबंध श्री. भुयार यांनी स्पष्ट केला. वेदना ही गझलेची प्रेरणा असते. गझल मानवी जीवनातील दुःख, विरह, अस्वस्थतेला मुकर करते. सुरेश भटांनी मराठी मनामनात गझल रुजवली. गझलेच्या आस्वादातून मानवी जीवन समृद्ध होते. दुःखाला अभिव्यक्त करण्यात गझलेला यश येते. सर्वसामान्य माणसाला गझल विरेचनाचा अनुभव देते.गझल मधील शेर,मथळा यांचे स्थान आणि महत्त्व भुयार यांनी मांडले.[ads id="ads2"]
प्राध्यापक डॉ. जी.आर. ढेंबरे यांनी कार्यशाळा आयोजनामागील आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांसाठी लेखक ,कवींची भेट हा एक आनंदसोहळा असतो. काव्यरचनेतील तांत्रिकता,रूपबंध विद्यार्थ्यांना समजला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला अशा कार्यशाळेतून प्रेरकतत्व भेटतात. काव्यनिर्मिती प्रक्रिया आणि आस्वाद विद्यार्थ्यांना समजून घेता येतो. या कार्यशाळेत दुसऱ्या सत्रात प्राध्यापक डॉ.जी.आर.ढेंबरे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. एस.आर.चौधरी ,ज्येष्ठ प्राध्यापक एम. एस. पाटील ,प्राध्यापक डॉ. ए.एन. सोनार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापक सी.पी.गाढे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक एस.डी.धापसे यांनी केले. या कार्यशाळेत प्राध्यापक डॉ.एस.बी. गव्हाड ,प्राध्यापक डॉ. बी.जी. मुख्यादल ,प्राध्यापक एस.बी.धनले, प्राध्यापक एम.डी.तायडे, प्राध्यापक देविदास महाजन ,प्राध्यापक चेतन सुतार ,प्राध्यापक सागर महाजन, प्राध्यापक दसनूरकर, प्राध्यापक वाघ, प्राध्यापक वैभव जोशी हे उपस्थित होते.
शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयीन अधीक्षक युवराज बीरपण, श्री.पी.के. महाजन,श्री.एम.टी.महाजन, श्री.एस.के.महाजन,श्री.आशिष घुगे, श्री.आर.एस.पाटील,श्री.ईश्वर बारी, श्री.सुनील मेढे,श्री.युवराज धनगर , श्री.सतीश वाघ ,श्री.अक्षय अग्रवाल, श्रीमती.माया अग्रवाल यांनी कष्ट घेतले. महाविद्यालयातील विद्यार्थी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

