यात ते कधी खिचडी तर कधी साबुदाणा फराळ, भाजी पोळी च जेवण अन्नदान केलं जातं. याचा लाभ भुकेले,गोरगरीब गरजू व्यक्ती घेऊन आपली भूक भागवत असतात आणि त्या गरजूंची भूक भागून आत्मा तृप्त होतो म्हणून रावेर येथील पिंटूभाऊ वाघ मित्रपरिवाराच्या प्रत्येक सदस्याला ते करत असलेल्या आपल्या कार्याचं समाधान वाटत असल्याचे त्यांनी "सुवर्ण दिप न्युज" शी बोलताना सांगितले. [ads id="ads2"]
त्यांच्या या उपक्रमामुळे रावेर परिसरासह तालुक्यातच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात त्यांचे काम प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमासाठी, सुनिल शिरतुरे, भूषण महाजन बापूराव महाजन, रवि पाटील, महाजन धनराज महाजन, राहुल अमित पाटील, प्रदिप तायडे, हर्षल बेलस्कर, गोपाल तायडे, लखन वाघ, गौरव श्रीखंडे अविनाश इगळे या सर्व सहकऱ्याचं सहकार्य लाभत असते. या त्यांच्या उपक्रमाचे रावेर शहरासह तालुक्यातील व पंचक्रोशीतिल लोकांकडून त्यांचेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

