अज्ञात वाहनाच्या धडकेत रावेर तालुक्यातील दोन तरूण ठार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 रावेर (सुवर्णदिप वृत्तसेवा) नाशिक येथून दुचाकीने घरी येणार्‍या रावेर तालुक्यातील दोन तरूणांना रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे.[ads id="ads1"] 

नाशिक (Nashik) येथून दुचाकीने रावेरला (Raver) जाणाऱ्या मित्रांचा बुधवारी रात्री जळगाव येथील जैन इरिगेशनजवळ अपघात झाला. त्यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. यश वासुदेव महाजन (Yash Vasudeo Mahajan) (वय २२, रा.रोकडा हनुमाननगर, रावेर) व सुमीत दिवाकर पाटील (Sumit Diwakar Patil)  (वय २६, रा.पुनखेडा, ता.रावेर) अशी त्यांची नावे आहेत.[ads id="ads2"] 

यश हा मंगळवारी म्हाडाची परीक्षा (Mhada Exam) देण्यासाठी नाशिकला(Nashik) गेला होता. बुधवारी परीक्षा आटोपल्यावर तो व त्याचा पुनखेडा (Punkheda) येथील रहिवासी मित्र सुमीत पाटील दुचाकीने नाशिक येथून रावेरला येण्यासाठी निघाले. 

हेही वाचा: - Jalgaon : जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरु करण्याची मागणी 

हेही वाचा :- खळबळजनक : विनयभंग पिडीत अल्पवयीन मुलीची मनस्तापातून गळफास घेऊन आत्महत्या 

जळगाव (Jalgaon) जवळील जैन इरिगेशनसमोर (Jain Irrigation) त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात यशचा जागीच, तर सुमीतचा जळगाव येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यश महाजन याच्यावर रावेर (Raver) येथे, तर सुमीत पाटील याच्यावर पुनखेडा (Punkheda) येथे शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!