सांगवी येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसिलदार याना दिले निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे

यावल तालुक्यातील माय सांगवी येथे 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर तीन नराधमांनी बडजबरीने अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेचा निषेध म्हणून दि. २ जानेवारी बुधवार रोजी रावेर येथे नायब तहसीलदार संजय तायडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवेदन दिले.[ads id="ads1"] 

    यावेळेस माजी जि.प.सदस्य रमेश पाटील,तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी,पं.स.सदस्य दीपक पाटील,महिला जिल्हासरचिटनिस मायाताई बारी,शहराध्यक्ष मेहबूब शेख, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील,[ads id="ads2"] युवक जिल्हाउपाध्यक्ष कुणाल महाले,निंभोरा सरपंच सचिनभाऊ महाले,रायपूर सरपंच रुपेश पाटील,महिला तालुकासरचिटणीस सुरेखाताई सोनवणे,रावेर येथील पिंटूभाऊ वाघ, गंभीरदादा उन्हाळे,चेतन पाटील,धनराज महाजन,आकाश रिल, सतीश निकम,राहुल महाजन,नितीन पाटील,अमोल पाटील,योगेश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.