यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील पंधरा वर्षीय बालीकेवर तीन नराधामाने दि. २६ जानेवारीला दुपारी ३ वाजेच्या दरम्यान शेतामध्ये अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेचे तिव्र पडसाद संपुर्ण जिल्हयात उमटले. महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असुन सरकारने या संदर्भात जातीने लक्ष घालुन महिलांना संरक्षण दिले पाहीजे. अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा झाली पाहीजे संताप व्यक्त करण्यात आला.[ads id="ads2"]
पोस्को आणि शक्ती कायद्याने फाशीची शिक्षा झाली पाहीजे. तसेच मनोधैर्य योजनेतून तरुणीला समाजात मानाने जगता यावे यासाठी आर्थिक मदत मिळावी असे निवेदनाद्वारे करण्यात आले.
यावेळी युवा पिढीतील रणरागीणी म्हणुन शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलींवर व स्त्रियांवर होत असलेल्या अन्यायाविरुध्द तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महिला अत्याचाराच्य घटनेमुळे सम वाजमन संतप्त झाले आहे. त्या पिडीतेला न्याय मिळावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांना निषेध निवेदन देत आहोत.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे व महिला आघाडी रावेर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते रावेर ता.अ. वचित बहुजन आघाडी शिरतुरे रावेर ता. उपाध्यक्ष सलीम शाह वचित बहुजन आघाडी, रावेर ता. सचिव वचित बहुजन आघाडी कंदरसिंग बारेला, रावेर शहर उपाध्यक्ष मुकेश बारेला, जिल्हाउपाध्यक्ष सुलभा दिनेश मुसळे, जिल्हासंघटक अलका भागवत पारधी, तालुका अध्यक्ष गायत्री मोहन कोचुरे, तालुका सचिव रेखा प्रमोद जावरे, तालुका उपाध्यक्ष आशा प्रभाकर नेहेते, सदस्य माधुरी पंडीत भालेराव, सदस्य पुनम कैलास कोचुरे, सदस्य रत्ना आनंदा सोनवणे आदी उपस्थित होते.

