जळगाव जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशात आज दुपारी जळगाव शहरातील एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.[ads id="ads1"]
कोमल ज्ञानेश्वर कांबळे (वय-२०) या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
याबाबत असे की, Jalgaon शहरातील भारत नगर मध्ये आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास असलेली कोमल कांबळे हिने दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसतांना कोमल हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली.कोमल हिचे वडील खासगी लक्झरी चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात.
हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. युवतीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
हेही वाचा :- धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू
घटनेची माहिती मिळाताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. डॉ. रेणुका भंगाळे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोहेका संजय झाल्टे आणि महिला पोलीस कर्मचारी रेश्मा मालवणकर हे करीत आहे.

