जळगाव जिल्ह्यात महसूल वसुलीत "हा "तालुका प्रथम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


मार्च अखेरपर्यंत १०० टक्के वसुलीचा तहसिलदार नितीन देवरे यांचा मानस

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  शासनाच्या दरवर्षीच्या मार्च अखेरपर्यंत १०० टक्के वसुलीचा धरणगाव तहसिलदार (Dharangaon Tahsildar) नितीन देवरे यांचा मानस धोरणानुसार महसूल विभागाला दिल्या जाणाऱ्या आर्थिक वर्षातील महसूल वसुलीच्या उद्दिष्टपूर्ती मध्ये जळगाव (Jalgaon) जिल्ह्याला एकूण १७७. ८४ कोटी इतके टार्गेट देण्यात आले असून[ads id="ads1"]  या उद्दिष्टपूर्ती मध्ये आतापर्यंत धरणगाव तालुक्याने (Dharangaon Taluka) एकूण ९. ९५ कोटीपैकी ७. ३८ कोटी म्हणजेच ७४. ३२ टक्के वसुली केली असून तालुका जळगाव जिल्ह्यात(Jalgaon District)  प्रथम क्रमांकावर असून यात तालाठयामार्फत नियमित महसूल वसुली, गौणखनिज वसुली व इतर बाबी वसुली सुरू असून मार्च अखेर सदर उद्दिष्ट १०० टक्के वसूल करण्याचे नियोजन धरणगाव तहसिलदार (Dharangaon Tahsildar) नितीन देवरे यांनी केले आहे. यासोबतच नागरीकानी आपल्याकडील प्रलंबित महसूल वसुली, अकृषक कर भरण्याचे आवाहन धरणगाव तहसिलदार (Dharangaon Tahsildar) नितीन देवरे यांनी केले आहे. सोबतच इनाम वतन प्रकरणे, नजराणा प्रकरणे, ब -सत्ता प्रकरणे, ४२ ब, क, ड ही प्रकरणे नागरिकांनी दाखल केल्यास तात्काळ आदेश पारित करून देण्यात येऊन ७।१२ ही देण्यात येईल त्यासाठी तहसिल कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन धरणगाव तहसिलदार (Dharangaon Tahsildar) नितीन देवरे यांनी केले आहे. याकामी तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी यांना उर्वरीत नियोजन करून देण्यात आले आहे.[ads id="ads2"] 

२०१९ पासून धरणगाव तालुका प्रत्येक बाबतीत मागेच पडत असायचा, पण गेल्या २ वर्षात तहसीलदार देवरे यांनी हे चित्र पालटून विविध उपक्रमाद्वारे प्रत्येक बाबतीत तालुका प्रथम क्रमांकावर आणला आहे. निवडणूक, संगायो योजना, सेतू कामकाज, शेतकऱ्यांचे कामकाज, गोरगरिबांना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना किराणा, उदरनिर्वाह किट वाटप, सुंदर माझे कार्यालय अभियान आदी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत.

धरणगाव तालुका १३ व्या क्रमांकावरून आणला प्रथम क्रमांकावर

२०१९ पासून धरणगाव तालुका प्रत्येक बाबतीत मागेच पडत असायचा, पण गेल्या २ वर्षात धरणगाव तहसिलदार (Dharangaon Tahsildar) नितीन देवरे यांनी हे चित्र पालटून विविध उपक्रमाद्वारे प्रत्येक बाबतीत धरणगाव तालुका प्रथम क्रमांकावर आणला आहे. निवडणूक, संगायो योजना, सेतू कामकाज, शेतकऱ्यांचे कामकाज, गोरगरिबांना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना किराणा, उदरनिर्वाह किट वाटप, सुंदर माझे कार्यालय अभियान आदी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!