वंचित बहुजन आघाडी चा महिला मेळावा खिर्डी येथे उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


  रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) दिनांक 13 फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने खिर्डी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या मेळाव्याच्या  अध्यक्ष वंदनाताई सोनवणे  महिला आघाडी जिल्हाध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष  विनोद भाऊ सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे,  जिल्हा उपाध्यक्ष  रफिक बेग, वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे उपस्थित होते.[ads id="ads1"] 

जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे हे आपल्या भाषणात म्हणाले की वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये सर्व स्तरातील समाज बांधव प्रवेश करीत असून वंचित बहुजन आघाडी या पक्षाची ताकदवाढत चालली असून, श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शना नुसार खेड्या पाड्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रसार आणि प्रचार जोमाने सुरू असून, लोकांना आता वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले.[ads id="ads2"] 

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे  महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की खेड्या पाड्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी गावोगावी मीटिंग बैठक घेऊन लोकांना वंचित बहुजन आघाडी ची रूपरेषा व ध्येय धोरण सांगून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा नातवाचा पक्ष असून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे संविधान लिहून तमाम भारत देशांमधल्या जाती-धर्माच्या लोकांच्या भल्यासाठी दोन वर्ष अकरा महीने  18 दिवस कालावधी  लागून हे संविधान लिहिले असून, सर्व धर्माच्या लोकांचे भले  या संविधानाच्या माध्यमातून  केले असून, भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित करून सर्वांना न्याय हक्क दिले. त्या बाबासाहेब आंबेडकरांचे  नातू श्रद्धेय  बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर  हेसुद्धा  बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून  या देशांमध्ये  वंचित समाजाला  न्याय हक्क  दिल्याशिवाय राहणार नाही व वंचित समाजाला  सत्य मध्ये  बसल्याशिवाय शांत बसणार नाही असे ते म्हणाले  2019 च्या  लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये  वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना 45 लाख  मतदान  मिळाले  आणि हे पाहून सत्ताधार्‍यांचे धाबे दणाणून गेले असे जिल्हाध्यक्ष म्हणाले.  अध्यक्षीय भाषणा मध्ये महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे ह्या भाषणा मध्ये म्हणाल्या की वंचित बहुजन आघाडी  हा पक्ष बौद्ध समाजाचा नसून बहुजन समाजाच्या हिताचा पक्ष आहे परंतु इथले जातीवादी  पक्ष संघटना  यांनी बहुजन समाजाची दिशाभूल केली असून वंचित बहुजन आघाडी बहुजन समाजाचा हिताचा पक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना अधिकार दिले त्यामुळे आजच्या महिला राज्यकर्त्या झाल्या आणि आज सरपंच पंचायत समिती अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार खासदार राष्ट्रपती असे मोठ्या मोठ्या पदावर विराजमान झाल्या हे कोणामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यामुळे नाही तर मनुवादी मनुस्मृतीने महिलांना चूल आणि मूल याच्या मध्येच बांधून ठेवले होते. म्हणून जास्तीत जास्त महिलांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश करून वंचित बहुजन आघाडी पक्ष मजबूत करावे असे अध्यक्षीय भाषणामध्ये त्या म्हणाल्या. या मेळाव्याचे प्रास्ताविक  वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी केले. 

           या मेळाव्यासाठी  वंदनाताई अराक, अलका पारधी, सुलभा मुसळे, आशाताई नेहते,जरीना ताई तडवी, शोभा सोनवणे, संत्रा बाई बारेला,  नितीन अवसरमल, गौतम          अटकाळे, सलीम शाह, कंदरसिंग बारेला, कालू बारेला, तरुण सवणे,  वंचित बहुजन आघाडी मध्ये  रामा कोचुरे, यशवंत भंगाळे, जीवन सोनवणे, भावना भंगाळे, रेखा पाटील यांनी प्रवेश केला. तसेच मेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन महिला आघाडी तालुकाध्यक्ष गायत्री कोचुरे व आभार कांतीलाल गाढे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!