रावेर शहरातील (Raver City) शाळा व महाविद्यालयीन मुलींची काही शाळाबाह्य युवक छेडखानी करत असल्याबाबत रावेर पोलिस निरीक्षक नागरे (Raver PI Kailas Nagare) यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी १५ दिवसांपूर्वी शहरात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या कर्कश हॉर्न वाजवणे ट्रिपल सीट फिरणे, वेडीवाकडी तसेच भरधाव वेगाने गाडी चालवणे, ड्रायव्हिंग लायसन्स नसणे, मास्क न लावणे अशा विविध कारणांवरून युवकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा रोडरोमिओविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पोलिस ठाण्याच्या रस्त्यावर राबवण्यात येत आहे.
कोणाचीही गय नाही, सर्वांनी नियमांचे पालन करावे -- कैलास नागरे, पोलिस निरीक्षक, रावेर,
शहरात दुचाकीवरून विनाकारण फिरून दहशत माजवणाऱ्या युवकांना प्रतिबंध करण्यासाठी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, सवांनी नियमांचे पालन करावे.

