आगामी नगर पालिका,जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुका संदर्भात वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण जिल्हा बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भुसावळ प्रतिनिधी (अरुण तायडे)
आगामी काळात जिल्ह्यामध्ये नगरपालिका ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती आदी निवडणुका येऊ घातल्याआहेत त्या निवडणुकांमध्ये पक्षाने चांगली कामगिरी करावी म्हणून Jalgaon जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
[ads id="ads1"] 

           Bhusawal शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी एक वाजता वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठक जळगाव जिल्हा  अध्यक्ष विनोद सोनवणे (Jalgaon District President Vinod Sonawane) यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हा निरीक्षक एडवोकेट रविकांत वाघ (Adv Ravikant Wagh) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.  [ads id="ads2"] 

  बैठकीच्या  सुरुवातीस त्यागमुर्ती रमाई आंबेडकर (Ramai Ambedkar) जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.बैठकीत सचिन सुरवाडे, बाळू शीरतुरे ,सुनील ठाकूर , विजय मालवीय सदस्य,ग्रा. पं.सदस्य ,वंदनाताई सोनवणे यांनी आपले मत व्यक्त केले. बैठकीत जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका (Panchayat Samiti Elelction)  , बुथ बांधणी,पक्ष संघटन या वर  विचारविनिमय करण्यात आला. सदर बैठकीत  पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक अड. रविकांत वाघ आणि जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


  सदर  JALGAON जिल्हा बैठकीस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे जिल्हा निरीक्षक अड.रविकांत वाघ जिल्हा महिला अध्यक्ष वंदनाताई सोनवणे जिल्हा महासचिव दिनेश ईखारे जिल्हा संघटक अरुण तायडे, कामगार आघाडीचे बालाजी पठाडे जिल्हा आय टी सेल प्रमुख सचिन बाऱ्हे,जिल्हा उपाध्यक्ष सुरडकर जिल्हा पदाधिकारी रफिक बेग , दिपक मेघे,आदींसह महीलाची उपस्थिती ही लक्षणीय होती.  या प्रसंगी अड. पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीत आणि रवी सोनवणे यांनी कामगार आघाडीत प्रवेश केला. बैठकीच्या यशस्वीते साठी मेजर देवदत्त मकासरे,रुपेश कुऱ्हाडे आदींनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!