रावेर ( प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील पाचही ग्रामसेवक यांचे अपंगत्व प्रमाणपत्र जिल्हा चिकित्सक, जळगांव यांनी त्यांच्याच कार्यलयाकडून दिले असल्याचे व सत्य असल्याचे पत्र रावेर गट विकास अधिकारी यांना दिले असले तरी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दि १०/२/२०२२ चे व दि १७/०२/२०२२ ची दोन्ही पत्र पाहता श्री राहुल रमेश लोखंडे, श्रीमती छाया रमेश नेमाडे, नितीन दत्तू महाजन, रवींद्रकुमार काशीनाथ चौधरी आणि शामकुमार नाना पाटील यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचेच दिसून येत आहे. [ads id="ads1"]
. दि १०/०२/२०२२ रोजी गट विकास अधिकारी, रावेर यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात : शासनाने SADM प्रणाली बंद केली असल्याने दिलेल्या प्रमाणपत्राची खात्री करता येत नाही, असं सांगतात आणि संबधित ग्रामसेवक यांना शल्य चिकित्सक दि १६/०२/२२ रोजी तपासणीसाठी बोलवतात. [ads id="ads2"]
संबधीत ग्रामसेवक तपासणी साठी जातही नाही आणि लगेच दुसऱ्याच दिवशी दि १७/०२/२२ रोजी अपंगत्व प्रमाणपत्र खरी असल्याचा निर्वाळा देतात,त्या मुळे ह्या प्रकरणातील गुढ आणखीनच वाढले आहे, तक्रादार यांचेशी संपर्क केला असता सदर प्रकरणी या पुढे देखील पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे मूळ तक्रारदार नजमुद्दीन शेख आणि किशोर भिवा तायडे यांनी बोलतांना सांगितले.

