शासनाअंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा वाघोड (Waghod) येथील विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश वितरीत करण्यात आला. यात एकूण १८५ मुलांपैकी १३५ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी अनुदान मिळाले होते.[ads id="ads1"]
तर उर्वरित ५५ मुले जनरल प्रवर्गातील असल्यामुळे त्यांना शासनाकडून मोफत शालेय गणवेश मिळत नव्हता. ही बाब जिल्हा परिषद (Zilha Parishad) केंद्र शाळा वाघोड (Waghod) येथील शिक्षकांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या लक्षात आणून दिली. समितीने वर्गणी जमा करून उर्वरित ५५ विद्यार्थ्यांना गणवेश दिले. यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचे, चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.[ads id="ads2"]
त्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी तसेच शिक्षकांनी वर्गणी जमा करून, अनुदान न मिळालेल्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. यावेळी वाघोड ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मशाने ,(Sarpanch Sanjay Mashane) , उपसरपंच सरस्वती महाजन (Upsarpanch Sarswati Mahajan) , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चेतन महाजन, नरेंद्र महाजन, संतोष चौधरी, मनीष चौधरी, मुख्याध्यापक जमीला तडवी, शिक्षक विजय पवार, सिंधु राठोड, सुनील महाजन, तुषार पाटील, संदीप जाधव उपस्थित होते.

