आज दिनांक 12 फेब्रुवारी सायंकाळी 4 वाजता वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे अध्यक्ष सौ. गायत्री कोचुरे महिला आघाडी अध्यक्ष ह्या होत्या. [ads id="ads1"]
या बैठकी मध्ये प्रमुख उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग आणि वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, जिल्हा संघटक महिला आघाडी सुलभा मुसळे, आशाबाई नेहते, अलकाबाई पाटील यांनी मार्गदर्शन केले. [ads id="ads2"]
वंचित बहुजन आघाडी चे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी महिलांना श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर यांचे ध्येय धोरण व वंचित समाजाला सत्ते मध्ये कशा प्रकारे बसवायचे या बाबतची माहिती दिली. इथला तळा गाळातील वंचित समाज सत्ते मध्ये कशा प्रकारे बसवायचे म्हणून वंचित समाजाला जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडी मध्ये आणून त्यांच्या हाती कशाप्रकारे सत्ता दिली जाईल या बाबतीत सविस्तर माहिती दिली आणि उद्या दिनांक 13 फेब्रुवारी रविवार रोजी खिर्डीयेथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या महिला आघाडीचा मेळावा आयोजित केला असूनहा मेळावा. जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर होणार आहे. मेळाव्याची वेळ दुपारी 2 वाजता आहे. या मेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे, जिल्हा प्रवक्ता विनोद भाऊ इंगळे, महिला आघाडी अध्यक्षा वंदनाताई सोनवणे तसेच जिल्ह्याच्या महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी रावेर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी, ग्रामीण शाखा पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आव्हान रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, महिला आघाडी अध्यक्षा गायत्री कोचुरे, नितीन अवसरमल, कंदरसिंग बारेला, तरुण सवर्णे, भूषण सवर्णे, सुरेश अवसरमल, रामा कोचुरे, यादव कोचुरे, गोपाल कोचुरे, नीलेश कोचुरे, सुरज मोरे, सुरज कोचुरे, संत्रा बाई बारेला, सरलाबाई रायमळे, अंकुश कोचुरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

