भुसावळ प्रतिनिधी ( अरुण तायडे) आज भुसावळ नगर परिषद हद्दीत विविध विकास कामाच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील शहरात आले होते. एच डी एफ सी बँक जवळील भागात होणाऱ्या विकासकामांच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम आटोपून पालकमंत्र्याचा ताफा [ads id="ads1"] डी एस हायस्कूल जवळील कार्यक्रमाला जात असताना बाजारपेठ पोलिस स्टेशन जवळ महाराजांच्या पुतळ्या साठी नियोजित केलेल्या जागे जवळ वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्या सह थांबले होते जसा ताफा जवळ आला तसाच वंचितचे पदाधिकारी आपले निवेदन देण्यासाठी पालकमंत्र्यांचा गाडी कडे चालत गेले रस्त्यातच विनोद सोनवणे यांनी पालकमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व्यथा मांडली. [ads id="ads2"]
निवेदन देत विनंती केली कि , बाजारपेठ पोलिस स्टेशन जवळ जी जागा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ठरली असताना ही गेल्या अनेक वर्षापासून अजून ही शिवरायाचा पुतळा बसविणे सत्ताधाऱ्यांना शक्य झाले नाही.ज्या महाराजांना अख्खा महाराष्ट्र आपले दैवत मानतो त्या जाणत्या राजाचे पुतळा रुपी स्मारक दुर्लक्षित राहत असेल तर शरमेची बाब आहे.आपण पालकमंत्री आहात राज्यात शिवसेनेचे सरकार आहे तेव्हा शिवरायाचा पूर्णाकृति पुतळा बसवून भुसावळकराची इच्छा पूर्ण कराल अशी मागणी निवेदन सादर करते वेळी करण्यात आली. सदर प्रसंगी यापूर्वी याच जागेचे भूमिपूजन करणारे आमदार संजय सावकारे हे देखील पालक मंत्र्याच्या ताफ्यात या वेळी दिसून येत होते.
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या समवेत वंचितचे जिल्हा महासचिव दिनेश इखारें,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, कामगार आघाडीचे बालाजी पठाडे,बंटी सोनवणे,तालुका सचिव गणेश इंगळे,मेजर देवदत्त मकासरे,रुपेश कुऱ्हाडे,विजय मालवीय,कुणाल सुरडकर,सुनील ठाकूर आदी सह अनेक महिला उपस्थित होत्या.

