रावेर (Raver) तालुक्यातील कांडवेल (Kandwel) शेती शिवारात आज दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाचे (Forest) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.[ads id="ads2"]
सुत्रांकडून मिळलेले माहितीनुसार, कांडवेल (Kandwel) शेती-शिवार मध्ये बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या आहे. यामुळे कांडवेल (Kandwel) परिसरातील शेतकरी व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :- ६१ लाखांच्या शेष फंडासाठी रावेर पंचायत समितीमध्ये बंदद्वार बैठकीने चर्चेला उधाण !
घटनेची माहिती वनपाल अतुल तायडे यांना समजताच ते आपल्या कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी गेले व पगमार्ग बघितले असता हल्ला करणारा प्राणी बिबट असल्याचे निष्पन्न झाले. वनपाल अतुल तायडे यांनी नागरीकांना सर्तक राहण्याच्या सूचना केल्या असून बिबट्यासाठी या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे.

