भुसावळ ( अरुण तायडे ) शहरात आज भुसावळ नगर परिषद हद्दीत सुमारे ६.२२कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम पार पडला त्यात त्या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील बोलत होते.[ads id="ads1"]
या बाबत माहिती अशी कि,भुसावळ नगर परिषद हद्दीत अनेक कामे मंजूर आहेत त्यातील एच. डी एफ सी बँक, द.शि.विद्यालय आणि श्री नगर भागातील विकास कामाच्या भूमि पूजनाचा कार्यक्रम जिल्हाचे पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. [ads id="ads2"]
त्या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले कि भुसावळशी आमचे जुने नाते आहे भुसावळचे शिव सेनेला पहिला आमदार दिला आहे. ज्या प्रमाणे जळगाव महानगराचा कायापालट करत आहे त्या प्रमाणे भुसावळ शहराचा ही विकास करीन अशी घोषणा केली.
सदर प्रसंगी व्यासपीठावर गुलाबराव पाटील,भुसावळचे आमदार संजय सावकारे,नगराध्यक्ष रमण भोळे,भुसावळ नगर परिषद चे प्रशासक रामसिंग सुलाने,मुख्याधिकारी संदीप चित्रवार, डी वाय एस पी गजानन राठोड,बाजार पेठ पो. स्टे.चे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आदीची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीस आमदार संजय सावकारे यांनी शहरातील वाढती गुंडगिरी आणि अतिक्रमण या बाबत चिंता व्यक्त करीत या वर अंकुश लावण्या बाबत पालकमंत्र्यांना विनंती आहे.
सदर कार्यक्रमास विविध पक्षातील नगरसेवक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

