आम्ही सर्व भाऊ मिळून मिसळून खाऊ अशा वाक्प्रचार आहे. त्याची अनुभूती शुक्रवारी रावेर पंचायत समितीत मासिक सभेत अनुभवता आली. १५ वित्त निधीसाठी एकमेकांविरुद्ध रान पेटवणारे सदस्य शेष फंडाच्या ६१ लाखाच्या निधीसाठी सभापती कविता कोळी यांच्या दालनात बंदद्वार चर्चा करतांना दिसून आले. [ads id="ads1"]
विशेष म्हणजे या बैठकीला फक्त सदस्य उपस्थित नव्हते तर सभापती कविता कोळी यांचे पती हरलाल कोळी आणि उपसभापती धनश्री सावळे यांचे पती संदीप सावळे, माजी सभापती माधुरी नेमाडे यांचे पती गोपाळ नेमाडे देखील यावेळी उपस्थित होते.[ads id="ads2"]
शेष फंडाच्या निधीच्या संदर्भात झालेल्या विशेष सभेत सभापती कविता कोळी, माजी सभापती माधुरी नेमाडे, सदस्या प्रतिभा बोरोले, योगिता वानखेडे, गटनेते पी के महाजन, दीपक पाटील, योगेश पाटील, पंचायत समिती सदस्या रुपाली कोळी यांचे पती विश्वनाथ कोळी उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला प्रशासकीय अधिकारी बिडीओ दिपाली कोतवाल या सभेच्या आयोजक होत्या. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत इतरांना सहभाग घेऊ देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. १५ वित्त आयोगाच्या निधीचे असमान वाटप झाल्याने, विरोधी गटाच्या सदस्यांनी रान पेटवून दिले स होते. यात सत्ताधारी गटाला आराखडा रद्द करण्याची नामुष्की पचवावी लागली. यानंतर शेष फंडाचा मोठा निधी रावेर पंचायत समितीला प्राप्त होणार असल्याने आचार संहिता लागण्याआधी निधी खर्च करण्याबाबत विचार विनिमय व्हावा यासाठी शुक्रवारी ही सभा झाली. शासकीय नियम डावलून सभा झाल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
६१ लाखाचा शेषफंड रावेर पं. स.ला मिळण्याची शक्यता आहे. त्यात ६५ टक्के निधी विकास कामांवर व इतर निधी महिला बालकल्याण, अपंग, अनुसूचित जाती जमाती अशा शेषवर खर्च केला जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती.
---- दिपाली कोतवाल, गटविकास अधिकारी

