डेंगू मलेरिया फ्लू तसेच covid-19 च्या आजाराला देखील सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात थैमान घातलेल्या covid-19 च्या आजारामुळे विवरा बुद्रुक व विवरा खुर्द येथे कोरोणा काळात सुमारे 150 च्यावर लोकसंख्या मृत्यू पावले आहे. तरी मात्र या परिसरात राहणाऱ्या लोकांना छोटया मोठया आजारांना समोरे जावे लागत आहे. [ads id="ads2"]
ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे .स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत विवरे बुद्रुक प्रशासनाने स्वच्छते बाबत मोहीम आजपर्यंत राबवलेली नाही व स्वच्छते बाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही हा प्रकार वारंवार घडत असल्याचे या ठिकाणी निर्देशनास आले आहे . या ठिकाणी राहणाऱ्या मतदार नागरिकांना प्रदूषित पाण्याचा व रोगराईचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . असे ग्रामस्थांचे म्हणने आहे .
विवरा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील यांच्या देखरेखेखाली विवरा खुर्द येथील नाल्यांची साफसफाई व खोलीकरण करण्याचे काम चालू आहे. विवरा खुर्द या गावातील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत व स्वच्छ गाव सुंदर गाव बनवण्याचा प्रयत्न करत आहे तसेच या गावातील नागरिक ग्रामपंचायत प्रशासन विवरे खुर्द चे कौतुक देखील करत आहे.
तसेच या गावात मनरेगाच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा , स्वच्छ भारत मिशन अंतर्गत "स्वच्छ गाव सुंदर गाव" बनवण्याचा देखील विवरे खुर्द चा प्रयत्न चालू आहे .व कार्य देखील पाहायला मिळत आहे . येथील यासिन मोहल्ला व विवरे बु. वार्ड क्र. एक व वार्ड क्र. दोन या ठिकाणा पर्यंत विवरे खुर्द चे ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील यांच्या प्रयत्नामुळे यासीन मोहल्ला पर्यंत काम चालू आहे . मात्र विवरा बुद्रुक येथील तुंबलेल्या गटारीतील वाहत असलेल्या प्रदुषीत पाण्यामुळे कामास विलंब होत आहे. व विवरे बु ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे स्वच्छतेच्या कामास विलंब होत आहे. असे ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील यांचे म्हणणे आहे.

