रावेर मधील " त्या" तिघांना पोलीस कोठडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर शहरातील (Raver City) अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पंचनामा करीत असताना तलाठी व कोतवालास धक्काबुक्की करून वाळू उपसून ट्रॅक्टर (Tractor) पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही भावांना अटक केली. तसेच रावेर तहसील कार्यालयाच्या (Raver Tahsil Office) आवारात जप्त केलेले तेच ट्रॅक्टर दोन्ही आरोपींच्या तिसऱ्या भावाने पळवून नेले होते. या दोन्ही गुन्ह्यात रावेर न्यायालयाने (Raver Court)  या आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.[ads id="ads2"] 

 Raver तलाठी दादाराव कांबळे व कोतवाल गणेश चौधरी यांना मदिना कॉलनीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पंचनामा करीत असताना ट्रॅक्टर (Tractor) मालक सुपड्या शेख हसन व त्याचा भाऊ सलमान शेख हसन यांनी धक्काबुक्की केली होती. दरम्यान आरोपींचा भाऊ आरीफ शेख हसन (रा. इमामवाडा, रावेर) यास सदरचे ट्रॅक्टर Raver तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेले होते.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!