धरणगाव वनविभाग अंतर्गत राजवड परिमंडळ क्षेत्राला आग, झाडे व रोपे आगीत जळून खाक ; दोषींवर कारवाई करा - वृक्षमित्र आबासाहेब राजेंद्र वाघ यांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


धरणगाव प्रतिनिधी (पी.डी.पाटील) धरणगाव शहरालगत असलेल्या राजवड परिमंडळ नियातक्षेत्रात दुपारी दीड वाजता आग लागली. यामध्ये वनविभागाचे हजारो मिश्ररोपण आगीत जळुन खाक झाली. धरणगाव शहराला लागून असलेले गट क्र. १२८० क्षेत्रातील आग इतकी भयानक होती की आगीच्या क्षेत्राला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहचली. परंतु शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही.[ads id="ads1"] 

             सन २०२१-२२ ह्या वर्षी जळगाव वनविभाग धरणगाव अंतर्गत, वनक्षेत्र एरंडोल च्या नियतक्षेत्र राजवड  गट क्र १२८० येथे राज्य योजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात १५.०१ हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले दोन रोपांचे अंतर ३×३ मी एवढे होते. [ads id="ads2"] 

   या रोपवणात एकूण ९२३७ खड्ड्यात अनेक प्रजातीचे रोपे लावण्यात आले होते. परंतु आज दि. ८ फेब्रुवारी २०२२ ला दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीमध्ये वाऱ्याच्या झुळकी संपुर्ण रोपवन आगीच्या कवेत आले आणि संपुर्ण रोपवन आगीत जाळून खाक झाले तसेच या रोपवणात असलेले विविध प्रकारची अनेक झाडे आणि वनस्पती सुध्दा जळुन नष्ट झाली आहे. सदरील आग कशी लागली याची सविस्तर माहिती वनपाल अनिल साळुंखे यांना विचारणा केली असता आगीचे कारण समजले नाही असे सांगितले. 

हेही वाचा :- अरे बापरे !!! अवघ्या ५० रुपयासाठी गेला एकाचा जीव ; जळगाव जिल्ह्यातील घटना 

दरम्यान वनक्षेत्राच्या परिसराला आग लागल्याने वनविभागाचे वनपाल अनिल साळुंखे, वनरक्षक एन एन क्षीरसागर, कर्मचारी शांताराम पाटील, सागर झुंझारराव व गावातील राजेंद्र वाघ, पवन माळी, समाधान माळी, देविदास महाजन, बापू बडगुजर, भूषण महाजन, राहुल माळी नपा चे टँकर चालक निलेश महाजन आदींनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात लवकर आटोक्यात येत नव्हती. या आगीत लाखो रुपयांचा शासनाचा नुकसान झाला असून संपुर्ण रोपवन जळुन खाक झाले आहे. 

      शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी करोडो रुपये खर्च करीत असते, जंगलाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी व पर्यावरण चा समतोल साधण्यासाठी झाडे लावा - झाडे जगवा, शासन वृक्ष लावण्यावर अनेक योजना राबवित असते व करोडो रुपयाचा खर्च करीत असते परंतु वनविभागाच्या निष्काळजीपणा मुळे संपुर्ण रोपवन उध्वस्त होऊन लाखो रुपयांचा चुराडा होत असेल तर काय होईल. असा प्रश्न सामान्य सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी वनपाल अनिल साळुंखे यांना विचारणा केली. या लागलेल्या आगीत कोण दोषी आहे याची वन विभागाने चौकशी करून सबंधितावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ व परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!