धरणगाव तालुक्यातील कंडारी (Kandari) येथे अवघ्या ५० रुपयाच्या उधारी वरून काका-पुतण्यामध्ये झालेल्या मारामारीत काकाला आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.[ads id="ads1"]
यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील (Dharangaon Taluka) कंडारी येथे राजू मानसिंग भिल (वय २८) आणि भारत सुकडू भिल (वय ४४) या दोघांमध्ये 50 रुपयांच्या उधारीवरून दि 7 रोजी रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास शाब्दिक चकमक सुरू झाली. [ads id="ads2"]
थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजुने आपले काका भारत यांना जोराचा धक्का दिला. या धक्क्यात भारत हे जवळच्या गटारीत जाऊन पडले. गटारीत पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठा रक्तस्त्राव झाला. यानंतर भेदरलेल्या पुतण्या राजूने त्यांना लागलीच नातेवाईकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले.
हेही वाचा :- गॅसगिझर गळतीने महिला वैमानिकेचा मृत्यू; नाशिकमधील पंधरा दिवसातील दुसरी घटना
हेहे वाचा :- शेतातील झाडाला गळफास घेऊन 23 वर्षीय युवकाची आत्महत्या
हेहे वाचा :- स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री : मुक्ताईनगर तालुक्यातील दुकानदाराविरोधात गुन्हा
हेही वाचा :- किनगाव येथील तरूणाशी लग्न करून पैसे घेवून पसार झालेल्या नववधूला पोलीसांनी केली अटक
परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती भारत भिल यांना मृत घोषित केले. यासंदर्भात पुतण्या राजूविरुद्ध भादवि कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहे.


