🔹 छत्रपती शिवरायांचे कार्य अद्वितीय - पी.डी.पाटील सर.
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - १९ फेब्रुवारी, २०२२ शनिवार रोजी कृष्ण गीता नगर येथे कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
सर्वप्रथम सर्व बालगोपालांच्या हस्ते कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय व शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवराय मनामनात - शिवजयंती घराघरात , शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून कॉलनीतील उपशिक्षक पी.डी.पाटील यांच्या घरात शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. संकेत प्रमोद पाटील व रोहित महेंद्र सैनी याने स्वराज्याचे संस्थापक - रयतेचे राजे - छत्रपती शिवरायांच्या जीवनपटावर इंग्रजीतुन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.[ads id="ads2"]
शिवजयंतीचे औचित्य साधून कॉलनीतील उपशिक्षक पी.डी.पाटील यांनी छत्रपती शिवरायांचा जीवनपट मुलांना सांगितला. शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी रोहन जगदीश पवार, हर्षल प्रमोद पाटील, रोहित महेंद्र सैनी, संकेत प्रमोद पाटील, श्रेयश जगदीश पवार, इशिता सुनील कोळी, तनुश्री महेंद्र सैनी, आदिती सुनील कोळी व कॉलनीतील जेष्ठ बंधू भगिनी व मान्यवर उपस्थित होते.

