तब्बल चार वर्षांनंतर वाळू ठिय्याची रावेर तालुक्यात लिलावप्रक्रिया सुरू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर : वाळूचे दर शासनाने २८ जानेवारीच्या धोरणानुसार कमी केल्याने आता वाळूची टंचाई भासणार नसून सर्वसामान्यांना वाळू उपलब्ध होणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी रावेर तालुक्यातील वाळूचे ई-टेंडरिंग लिलावाचा नुकतेच दर कमी १७ फेब्रुवारी रोजी अध्यादेश काढलेला आहे. [ads id="ads1"] 
  यापुढे सर्व शासकीय तसेच खासगी बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना सहाशे रुपये ब्रास शासकीय दराने वाढ उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी ज्या वाळू घाटांचा दर ८० ते ९० लाख रुपयांपर्यंत होते त्याच वाळू गटांचे दर आता मोठ्या प्रमाणावर खाली उतरत शासनाने ८ ते ९ लाखापर्यंत आणल्याने आता वाळूचे लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आवाहन रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.[ads id="ads2"] 

  सुमारे गेल्या चार वर्षापासून शासन वाळू घाटांचे लिलावाची प्रक्रिया करीत होती. परंतु वाळू चे शासकीय दर मोठ्या प्रमाणावर असल्याने वाळू गटांचे लिलाव घेण्यास कोणीही धजावत नव्हते दरवर्षी वाळूचे दर शासनाने मोठ्या प्रमाणात ठेवले होते. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून रावेर तालुक्यातील करोडो रुपयांची वाळू उपसली गेली व वाळूमाफियांनी शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. त्यासाठी प्रशासनाला सुद्धा तारेवरची कसरत करत कारवाया कराव्या लागल्या. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून वाळूची मोठ्या  प्रमाणावर टंचाई भासली असून तालुक्यातील सर्व शासकीय बांधकामे तसेच खाजगी व्यवसायिक व घरकुल योजनेची सर्व कामे वाढवावी ठप्प आहेत. परंतु शासनाने २८ जानेवारीला धोरणात्मक निर्णय घेऊन वाळूचे दर कमी केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आता मात्र दर कमी असल्यामुळे वाळूचे ठेके जाणार हे मात्र नक्की आहे.

हेही वाचा:- धक्कादायक : प्रियकरासोबत मिळून फौजी पतीची हत्य

हेही वाचा : तापी नदी पात्रात २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू 


जिल्हाधिकारी यांनी रावेर तहसीलदार यांना पत्र देत वाळूचे ई-टेंडरिंग प्रक्रिया १७ जानेवारी २०२२ पासून सुरु झालेली असून ४ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने ई टेंडर सह इतर प्रक्रिया पार पडणार आहेत. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर ई.टेंडर प्रक्रिया संदर्भात माहिती उपलब्ध करून दिलेली आहे.

हे आहेत रावेर तालुक्यातील वाळू घाट 

तालुक्यातील सुकी, तापी भोकर नदीपात्रातील तसेच वडगाव जवळील सुकी नदीतील गट क्रमांक ७,१४,१५, १६,१७,२२,२४ व २५ तसेच आंदलवाडी येथील सुकी नदीपात्रातील वाळू गट क्रमांक ३५५ ते ३६०, केन्हाळा बुद्रुक येथील भोकर नदीतील वाळू गट क्रमांक ३३२, ३७८, धुरखेडा येथील तापी नदी पात्रातील वाळू गट क्रमांक ६१२ व ६१३, पातोंडी येथील भोकर नदीपात्रातील वाळू गट क्रमांक १९७,१४१,१४४,१५४, १५५, दोधे येथील वाळू घाट गट क्रमांक ४,५,१०,१४,१५,२१,२४ येथील वाळू गट 

अशा राहतील वाळू घाटांच्या किमती

रावेर तालुक्यातील तापी आणि भोकर नदीवरील वडगाव, - ९ लाख६३ हजार ६००, आंदलवाडी- ११ लाख१९ हजार केन्हाळा बुद्रुक, ७ लाख ९५ हजार, धुररखेडा ९ लाख ६६ हजार, पातोंडी - ७ लाख ९९ हजार २००, आणि दोधे-९ लाख ६६ हजार रुपये येथील वाळू गटांच्या किमती देण्यात आलेले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!