🔹तालुक्याची तंबाखूमुक्त शाळांच्या तालुक्याकडे वाटचाल!.....
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - सलाम मुंबई फाऊंडेशन व प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमांतर्गत धरणगाव तालुक्यातील सोनवद बुद्रुक या केंद्राने १००%तंबाखू मुक्त शाळाचे पहिले केंद्र होण्याचा मान मिळविला आहे. सोनवद बु॥ केंद्रात सर्व माध्यमाच्या १६ शाळा आहेत.[ads id="ads1"]
त्या १६ शाळांनी तंबाखू मुक्त शाळांचे ९ योग्य निकष यशस्वीपणे अपलोड करून आपल्या शाळा तंबाखू मुक्त केल्या. याकामी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व सोनवद केंद्राची धुरा समर्थपणे सांभाळणारे प्रभारी केंद्रप्रमुख दिलीप बाविस्कर सर व तालुकासमन्वयक संजय गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. त्याबद्दल त्यांच शिक्षण विभाग पंचायत समिती धरणगाव तर्फे मा.गटशिक्षणाधिकारी व्ही. एच.पाटील, मा.विस्तार अधिकारी चंद्रकांत डी.ठाकूर तंबाखूमुक्त शाळा तालुका समन्वयक श्री.संजय गायकवाड यांनी सोनवद केंद्रातील सर्व टिमचे अभिनंदन केले आहे. [ads id="ads2"]
त्याचप्रमाणे सोनवद केंद्रानंतर इतर केंद्रातील १००% शाळा तंबाखूमुक्त होऊन लवकरच धरणगाव तालुका तंबाखूमुक्त शाळांचा तालुका घोषित होईल. त्या दिशेने धरणगाव तालुक्याची वाटचाल सुरू आहे. याकामी आदरणीय गटशिक्षणाधिकारी व शिक्षणविस्ताराधिकारी यांच्यासोबत सलाम मुंबई फौंडेशनचे जळगाव जिल्ह्याचे ब्रँड आंबेसिडर राजमोहम्मद शिकलगर व जिल्हासमन्वयक संदीप खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व तंबाखूमुक्त शाळा तालुकासमन्वयक संजय गायकवाड मेहनत घेत आहेत.

