रावेर (Raver) तालुक्यातील मोठे वाघोदा (Mothe Waghode) येथील रहिवाशी रशीद अहमद तडवी वय अंदाजे ३६ वर्ष असून केळीचे मजुरीचे काम करणारा मजूर होता तो जेवणाचा डबा घेण्यासाठी फैजपूर (Faijpur) कडे मोटारसायकल क्र. एम एच १९ बी. जे ४३७८ वरून जात असताना सावदा(Savda) कडून येत असलेल्या अल्टो कार एम एच १९ एजी-६७६९ ही समोरून येत असताना अल्टो कारचा (Alto Car) लागून जबर धडस बसल्याने घटनेत मोटरसायकल स्वार रशीद अहमद तडवी हा गंभीर जखमी झाल्याने घटनेत जागीच ठार झाला.[ads id="ads2"]
माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली मयत तडवी यास शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालय रावेर ( Rural Hospital Raver) हलविण्यात आले असुन अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतले असून या बाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास स. पो. नि देविदास इंगोले (A P I Devidas Ingole) यांचे मार्गदर्शनाखाली सहकारी करीत आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा :- बोदवड तालुक्यातील उजनी दर्गा हजरत ख्वाजा न्यामतुल्ला शाहवली बाबा संदल मिरवणूक संपन्न
हेही वाचा :- मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद: रावेर पोलिसांची कामगिरी
हेही वाचा :- Jalgaon : पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील १७१ सरपंचांना पाणी पुरवठा योजना मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान
हेही वाचा :- निळे निशाण संघटनेचे यावल पंचायत समितीसमोर एकदिवसीय निर्दशने

