मुंबई : संजय पांडे यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा असलेल्या पदभारावरून न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले असताना राज्य सरकारने राज्याच्या पोलीस महासंचालकपदी (New DGP Maharashtra) रजनीश सेठ (Rajnish Seth) यांची नियुक्ती केली आहे. रजनीश सेठ 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.[ads id="ads1"]
आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी संभाळली आहे. दरम्यान, हेमंत नगराळे, के. वेंकटेशम, रजनिश सेठ या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
राज्याला अखेर मिळाले पूर्णवेळ महासंचालक संजय पांडे एप्रिल 2021 पासून राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत होते. राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळावी ही मागणी अनेक दिवसांपासून होती, अखेर आज रजनीश सेठ (Rajnish seth) यांची पोलीस महासंचालकपदी (New DGP Maharashtra) नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत 26/11 जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी एका फोर्स वन पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी सेठ (Rajnish seth) या पथकाचे प्रमुख होते. सेठ यांनी दोन वर्ष मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त होते.

