मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद: रावेर पोलिसांची कामगिरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्णदिप वृत्तसेवा) रावेर शहरातील (Raver City) एका दुकानासमोर मोटारसायकल चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात रावेर पोलिसांना (Raver Police)  यश आले आहे. रावेर पोलिसांनी चोरट्यांकडून चोरी गेलेली मोटारसायकल जप्त केली आहे. [ads id="ads1"] 
  रावेर शहरातील पटेल हार्डवेअर (Patel Hardware) यांचे दुकानासमोरुन ४ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या मालकीची हिरोहोडा कंपनीची स्प्लेंडर प्रो. मोटारसायकल(Splender Pro)  (क्रमांक एम. एच. १९ बीएच ३७७० ) चोरून नेली होती. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला (Raver Police Station) अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. [ads id="ads2"] 
  आरोपींचा गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक माहितीचे आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने शोध घेऊन आरोपी समीर अली लियाकत अली, रा. कोतवाल वाडा रावेर, साहिलवेग अस्लमवेग, रा. शंकर प्लॉट रावेर या दोघांना अटक केली. 

हेही वाचा :- Jalgaon : पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील १७१ सरपंचांना पाणी पुरवठा योजना मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान 

हेही वाचा :- निळे निशाण संघटनेचे यावल पंचायत समितीसमोर एकदिवसीय निर्दशने

हेही वाचा :- सावदा-फैजपूर मार्गावर अपघात; एक जण जागीच ठार 

  आरोपीकडून चोरीस गेलेली हिरोहोंडा (Hero Honda) कंपनीची स्प्लेंडर प्रो. मोटारसायकल हस्तगत केली आहे. रावेर पोलिस निरीक्षक कैलास नागरे (PI Kailas Nagare) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि शितलकुमार नाईक, पोकाँ. समाधान ठाकुर, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सचिन घुगे, अमोल जाधव, विकार शेख, पोकॉ. सुकेश तडवी या पथकाने चोरट्यांचा शोध घेऊन गजाआड केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!