हा पुरस्कार 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पबचत भवन येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक समता परिषदेचे राज्य अध्यक्ष भरत शिरसाठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. [ads id="ads2"]
मुकुंद सपकाळे यांनी विद्यार्थी दशेपासुन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवलेला आहे. तसेच गेल्या 35 वर्षांपासून त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, घाटकोपर व खैरलांजी अत्याचार प्रकरणीचे आंदोलन यासह Caa nrc रद्द करणेसाठीचे आंदोलन व शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठीचे आंदोलन तसेच विविध सामाजिक आंदोलने केलेली असुन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. तसेच भारतीय संविधानाची मानवी मूल्य व घटनात्मक मूल्य समाजात प्रतिष्ठित करण्यासाठी संविधानाचा प्रचार व प्रसार करून संविधान जागर करण्याचे कार्य केलेले आहे.

