रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे )रावेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त माता रमाई महिला मंडळा तर्फे तक्षशिला बुद्ध विहारात अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका रंजना गजरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपपूजा व धूपपूजा सुमन कोंघे,प्रमिला लोंढे, उजवला सुरदास व सोनाली वाघ यांनी केली.[ads id="ads1"]
यावेळी अंगणवाडी सेविका संगिता अटकाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त करतांना महाराजांनी ज्याप्रमाणे सर्व जाती जमातीच्या लोकांना एकसंघ करून स्वराज्याची स्थापना केली त्यांचा आदर्श घेऊन आपण जीवन जगलो पाहिजे आणि महाराजांचे विचार जीवनात अंगिकारने काळाची गरज आहे.कार्यक्रमास अरुणा रायमळे,मंगला दामोदरे,संगीता ससाणे,सोनाली वाघ, कांचन बनकर, सुनीता मेढे,साक्षी सुरदास, हर्षदा सुरदास आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी सुरदास तर आभार संगीता ससाणे यांनी केले.

