मुक्ताईनगर : तालुक्यातील कुहा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आहे. जयपाल चिंचोरे यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले.वडोदा ग्रामपंचायतीत नेमणुकीदरम्यान रजेवर असताना ई- निविदा प्रक्रिया राबविणे आणि चौकशीकामी कार्यालयाने मागणी करुनही दफ्तर उपलब्ध न करणे या कारणावरून चिंचोरे यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी गुरुवारी काढला. महिन्याभरात पंचायत समितीमधील तिघांचे निलंबन झाले आहे.[ads id="ads1"]
वडोदा येथील ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या खातेनिहाय चौकशीनंतर वडोदा ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी जयपाल चिंचोरे यांनी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाचे दफ्तर चौकशीकामी कार्यालयाने मागणी करुनही उपलब्ध न केल्याने, [ads id="ads2"] रजेवर असताना ई-निविदा प्रक्रिया राबविणे, निविदा इसारा व बयाणा रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात ऑनलाईन न स्वीकारता नमुना क्रमांक ७च्या पावती रोखीने स्वीकारणे, आदी बाबी प्रशासकीयदृष्टया या गैरवर्तणुकीच्या असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७मधील नियम ३च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याने चिंचोरे हे कारवाईसाठी पात्र ठरत असल्याने गटविकास अधिकारी नागटिळक यांनी त्यांचे निलंबन केले.

