राज्यस्तरीय माविम गौरव गीत स्पर्धेत गजेंद्र गवई यांना तृतीय क्रमांक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


बुलढाणा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामण्डल (माविम) च्या 47 व्या वर्धापन दिननिमित्ताने माविम अध्यक्षा ज्योतिताई ठाकरे(राज्यमंत्री दर्जा) यांचे सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय माविम गौरव गीत स्पर्धेत अस्मिला लोकसंचलित साधन केंद्र, सुल्तानपुर च्या व्यवस्थापक गजेंद्र गवई यांनी स्वतः गायलेल्या, स्वलिखित "माविमची कार्यप्रणाली देते.[ads id="ads1"] 

   महिलांना चालना । विकासाच्या वाटेवरी खुले केले नव दालना ।। या गितास राज्यातुन तृतीय क्रमांक साठी निवड करण्यात आली. आज दि 24 फेब्रूवारी 2022 ला माविम वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमात गजेंद्र गवई उपस्थित नसल्याने त्यांचे वतीने माविम बुलडाणा जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायड़े यांनी माविम मुख्यालयाच्या वतीने तृतीय क्रमांक साठी देण्यात येणारे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायड़े यांना उद्योग मंत्री मा सुभाष देसाई व प्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्मिला मतोडकर यांच्या हस्ते व माविम च्या अध्यक्षा मा ज्योतिताई ठाकरे मॅडम , व्यवस्थापकीय संचालक मा श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा , मा कुसुम बाळसराफ मॅडम याच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. [ads id="ads2"] 

बुलडाणा जिल्ह्यातून अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र, सुल्तानपुर ता लोणार चे व्यवस्थापक गजेंद्र गवई यांच्या स्वलिखित व स्वतः गायलेल्या माविम गौरव गिताला राज्यातुन 3 रा क्रमांक प्राप्त होणे माविम बुलडाणा परिवारासाठी अभिमानाची बाब आहे .

   सदर निवड व सन्मान बद्दल व्यवस्थापक गजेंद्र गवई यांचे अस्मिता केंद्राच्या अध्यक्षा शोभाताई जाधव, केंद्र कार्यकारणी, लेखापाल मयुरी गवई, सहयोगीनी रीना सरकटे,वर्षा पवार, लीला मते, मंगल आंधले, पूजा चव्हाण यांचे सह समस्त ग्रामसंघ पदाधिकारी,महिला बचत गटाच्या वतीने अभिनन्दन करण्यात येत आहे. 

 आपल्या निवडीचे श्रेय गजेंद्र गवई माविम बुलडाणा जिल्हा समन्वयक सुमेध तायड़े, लेखाधिकारी मुकुंद जहागिरदार, कुन्दन सदानशिवे,महेश राजपूत, विशाल पवार, शेगावकर , विजुभाऊ यांना देतात.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!