ऐनपूर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल) ऐनपुर येथे चोरीचे प्रकार वाढलेले असून चक्क ट्रॅक्टर ची ट्राली चारफाळी नांगर ट्रिलर चोरीला गेले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक २३फेब्रुवारी २०२२ रोजी च्या रात्री ऐनपुर येथील शेतकरी प्रमोद सिताराम पाटील यांच्या शेत गट नंबर ५३९ मधून ऐनपूर शिवारातून ट्रॅक्टरची ट्रॉली चार फाळांचे नांगर व टीलर यांची चोरी झालेली आहे.[ads id="ads2"]
काही दिवसांपूर्वीच मॉर्निंग वाक करणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र चोरीची घटना ताजी असतानाच शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली, चार फाळचे नांगर, व टीलर लांबलेला आहे तक्रारदार प्रमोद सिताराम पाटील यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून सी आर २५/२२ कलम ३७९ प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ व हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी हे करीत आहे.

