धक्कादायक : जळगावातील १४ वर्षीय विद्यार्थ्यांची गळफास घेवून आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव प्रतिनिधी : अभ्यासाच्या तणावातून १४ वर्षीय प्रेम प्रवीण सोनवणे (रा. इंद्रप्रस्थ नगर,जळगाव) या विद्यार्थ्याने वास्तव्यास असलेल्या राहत्या घरात साडीने गळफस घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी जळगाव शहर पोलीस (Jalgaon City Police Station)  ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

 याबाबत जळगाव शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार विभागातील कर्मचारी प्रवीण सोनवणे हे पत्नी, मुलगा प्रेम सोनवणे, मुलगी व आईसोबत वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा प्रेम हा सेंट लॉरेन्स इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये(Saint. lorence English Medium School)  नववीचे शिक्षण घेत होता.[ads id="ads2"] 

   दरम्यान, गुरुवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास प्रेम याने घरातील बेडरुममध्ये छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी प्रेमला खाली उतरवित त्याला परिसरातील नागरिकांनी तात्काळ खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली असता, त्याला मयत घोषीत केले. याप्रकरणी प्रफुल्ल पाटील यांच्या खबरीवरुन जळगाव शहर पोलीस ठाण्यात  (Jalgaon City Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रेम हा Jalgaon शहरातील सेंट लॉरेन्स शाळेत इयत्ता नववीचे शिक्षण घेत होता. तो अभ्यासात प्रचंड हुशार असल्याने तो अधिक वेळ अभ्यासाठी देत होता. दरम्यान अभ्यासाच्या तणावातून त्याने गळफास घेतला. या घटनेमुळे त्याच्या आईवडीलांसह नातेवाईकांना मानसिक धक्का बसला आहे. चौदा वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावामुळे टोकाचे निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात शोककळा पसरली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील, लहान बहिण व आजी असा परिवार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!