चोपडा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) तापी नदीतून (Tapi River) वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्याच्या मोबादल्यात १० हजाराची (Ten Thousand) लाच स्विकारणाऱ्या देवगावच्या तलाठ्याला (Devgaon Talathi) लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचुन रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात (Revenue) खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा तालुक्यातील (Chopda Taluka) आहे. तक्रारदार यांचे वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरवरती तापी नदीमधुन (Tapi River) वाळू वाहतूक करू देणेसाठी व वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे देवगाव (Devgaon) येथील तलाठी भुषण विलास पाटील (वय-३२) (Bhushan Vilas Patil) रा. पंकज नगर चोपडा याने दर महिन्याला १० हजाराची मागणी केली. [ads id="ads2"]
आज चोपडा तहसील (Chopda Tahsil Office) आवारात असतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला त्यानुसार तक्रारदार यांनी मागणीनुसार पहिला हप्ता म्हणून १० हजार रूपये घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे चोपडा तहसील कार्यालयात (Chopda Tahsil Office) खळबळ उडाली आहे.
यांनी पथकाने केली कारवाई
लाचलुचपत विभागाचे जिल्हा पोलीस (District Police) उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

