जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय बी. एस. पवार गुरुजी यांनी माघ पौर्णिमा निमित्ताने बौद्ध धम्मातील माघ पौर्णिमेचे महत्व आणि शिबिराची रूपरेषा सविस्तर पद्धतीने सांगितली. या शिबिराचा समारोप २७ फेब्रुवारी, रविवार रोजी होणार आहे. या शिबिरास केंद्रीय शिक्षिका म्हणून सुनीताताई वानखेडे लाभल्या आहेत. दररोज या शिबिरामध्ये महिलांना वेगवेगळ्या विषयांवर प्रवचन तसेच कृतीयुक्त विचार सांगण्यात येतील.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र जी जाधव हे होते. कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार गुरुजी जिल्ह्याचे कार्यालयीन सचिव आनंद जी ढिवरे तसेच जिल्ह्याचे पर्यटन विभागाचे सचिव सुभाष जी सपकाळे, जिल्ह्याचे जिल्हा संघटक सुरेश जी जोहरे हे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जळगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय जगदीश जी सपकाळे तसेच जळगाव तालुक्याचे तालुका संघटक यशवंत तथा सुपडू जाधव हेही उपस्थित होते. त्याचप्रमाणे ग्राम शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला आणि महिलांची हजेरी ही लक्षणे होती. या आजपासून सुरू होणाऱ्या या महिला शिबिरास महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्यासाठी आपले नाव ग्राम शाखेकडे नोंदविले. कार्यक्रमामध्ये जिल्हा स्तरावरुन आलेले जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांनी आपले विचार मांडले. उपस्थित महिलांनी ही शिबिराला पूर्णवेळ देऊन हजर राहू अशी ग्वाही देत स्वतःची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन ग्राम शाखेचे पदाधिकारी यांनी केले. कार्यक्रमांचे नियोजन ग्राम शाखेने तसेच यशवंत तथा सुपडू जाधव आणि धम्म सेविका माधुरीताई भालेराव यांनी केले.

