यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद हद्दीत नविन वस्तीमध्ये होत असलेल्या रस्त्यांचे क्रांकिटीकरणाचे आणि पाईप लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याबाबत चौकशी करून कार्यवाही करणेबाबत फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दि. 8फेब्रुवारी2022रोजी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देऊन चौकशी करून कार्यवाही करणेबाबत कळविले आहे.[ads id="ads1"]
यावल येथील राजेश कडू महाजन यांनी फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दि.24जानेवारी2022 रोजी लेखी तक्रार केली होती त्या नुसार यावल न.पा.हद्दीतील पाईप लाईन बाबत तसेच नविन वस्तीमध्ये होत असलेल्या रस्त्यांचे क्रांकिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी नुसार नविन वस्तीमध्ये केलेल्या रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाच्याका माबाबत आणि पाईप लाईन च्या [ads id="ads2"] कामाबाबत सविस्तर अहवाल या कार्यालयात तात्काळ सादर करावा व गुणवत्ता तपासणी अहवाल घेतल्या शिवाय अंतिम बील प्रदान करुन नये,किव्वा ठेकेदारास बील अदा करतांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून रितसर परवानगी घ्यावी असे दिलेल्या पत्रात फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

