कौतुकास्पद : रावेर येथील कार्यतत्पर तरुणाने वाचविले बाळाचे प्राण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 पुणे (विशेष प्रतिनिधी)  : मदत ऐनवेळी कधी कोणाला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही एका तरुणाने दाखविलेल्या तत्परतेमुळे एका बाळाचे प्राण वाचल्याची घटना कोथरूड परिसरात घडली आहे.[ads id="ads1"] 

 संदिपसिंह राजपूत हा जळगांव जिल्ह्यातील रावेर येथे राहाणारा एक तरुण दवाखान्याच्या कामासाठी पुणे येथें आला होता. फोर व्हिलर ओलाने (Ola ) जात असताना दिनानाथ रुग्णालय (Dinanath Hospital)  परिसरात रस्त्यावर एक मुस्लिम महिला हातात तहान बाळ घेऊन सैरवैरा धावताना दिसली तसेच तिच्या पाठीमागे बाळाची मोठ्यामोठ्याने आक्रोश करत होती.[ads id="ads2"] 

ही रस्त्यावरची सुरु असलेली घटना नागरीक पाहून केवळ बघ्याची भूमिका बजावत होते परंतु संदिपसिंह राजपूत ने कशाचाही विचार न करता बाळाच्या आईला क्या हुआ भेन आप क्यो भाग रही हों अशी विचारणा केली त्यावर त्या बाळाच्या आईने देखो ना भाई मेरा बच्चा कुछ आवाज नही कर रहा है.आँख भी नही खोल रहा है. सास भी नही ले रहा है.अशी रडता रडता राजपूत ला परिस्थिती सांगितली हे ऐकुन संदिपसिंह राजपूत च्या काळजाचे पाणी झाले एक ते दोन वर्षाचे बाळासह त्याच्या आईला पटकन ओला फोरव्हिल मध्ये बसण्याची विनंती केली ती महिलाही लगबगीने गाडीमध्ये बसली मात्र गाडीमध्ये बसलेल्या त्या महिलेचे रडणे ऐकून काही सुचत नसताना संदिपसिंह ने त्या महिलेला धीर देताना बाळाला काहीही होणार नाही.

हेही वाचा :- दुःखद : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे  येथील २५ वर्षीय युवकाची पूर्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या 

तुम्ही त्याची छाती दाबा तोंडानी श्वास द्या म्हणत ओलाच्या चालकाला गाडी जोरात चालविण्याची विंनती केली कोणत्याही परिस्थितीत बाळाला काही होता कामा नये ही गाठ त्याने मनाशी बांधली होती बाळाची आई त्याला तोंडाशी श्वास देत होती तिची धरपड सुरु होती ही धरपड सुरु असतानाचा बाळाने अचानक डोळे उघडले आणि बाळ रडू लागल्याने त्या बाळाच्या आईचा जीव भाड्यात पडला त्या बाळाचा आवाज ऐकून संदिपसिंह राजपूतलाही धीर आला. गाडीचा वेग तसाच ठेवून राजपूत दवाखान्यात पोहचला. त्याने डाॅक्टरांना बाळा बाबतीची हकीकत सांगताना बाळावर त्वरित उपचार करण्यासाठी विंनती केली.

डॅाक्टरानीही त्वरित उपचार सुरू केले काही वेळासाठी डॅाक्टरांनी थोडा वेळ बाहेर काढले बाळाला काही होऊ देऊ नको अशी पार्थना संदिपसिंह राजपूत बाहेर येऊन करत होता डॅाक्टरांनी दहा मिनिटांनी राजपूत आणि आईला बोलावून घेतले. बाळाला तापात अटॅक आल्याचे डॅाक्टरांनी सांगितले तुमच्या प्रथम उपचारामुळेच तसेच बाळाला लवकर दवाखान्यात आणल्यामुळे बाळ आज सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून संदिपसिंह राजपूतच्या डोळ्यातही पाणी आले आज आपण दाखविलेल्या तत्परतेमुळे एका बाळाचा जीव वाचला हा आनंदच संदिपसिंह राजपूत साठी मोठा होता.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!