महिलेने लग्नासाठी छळ केल्याचा आरोप
एका महिलेने लग्न करण्याचा तगादा लावल्याने मुक्ताईनगर (Muktainagr) तालुक्यातील उंचदा (Uchande) येथील अजय सीताराम इंगळे (वय २५) याने खामखेडा (Khamkheda) येथील पूर्णा नदीच्या (Purna River)पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. [ads id="ads2"]
याप्रकरणी संबंधित महिलेविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला. मृत अजयचा भाऊ मनोज इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगीता नामक एका महिलेने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी आग्रह धरून अजयचा मानसिक छळ केला.
हेही वाचा :- कौतुकास्पद : रावेर येथील कार्यतत्पर तरुणाने वाचविले बाळाचे प्राण
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून अजयने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल करून संशयित महिलेस ताब्यात घेतले.

