न्हावी ता.यावल (किरण तायडे) : तालुक्यातील हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र न्हावी आहे या न्हावी उपकेंद्रा मार्फत गुरूवारी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला व गावात रॅली काढत नागरीकांना क्षयरोग संदभातील विविध कार्यक्रम व उपक्रमांची माहिती आणी क्षयरोगाचे लक्षणे बाबत माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांच्या सहभागाने विविध बोधवाक्य असलेली फलक घेवुन काढण्यात आलेल्या रॅलीने नागरीकांचे लक्ष वेधले होते.[ads id="ads1"]
या रॅलीत क्षयरोगाची पुर्ण माहिती, क्षयरोग चे प्रकार, निदान, उपचार, निक्षय पोषण योजना अंतर्गत मिळणारा ५०० रूपयांचा लाभ, आवश्यक पोषण आहार, क्षयरोग आरोग्य साथी मोबाईल अप्स चा वापर कसा करावा याची माहिती नागरीकांना देण्यात आली.[ads id="ads2"]
गावात प्रभात फेरी नंतर विशेष कार्यक्रम जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळा न्हावी येथे घेण्यात आला या कार्यक्रमात न्हावी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याधापीक लता दिनकर महाजन, संजय नेहेते, उपशिक्षक प्रदिप बेंडाळे, मिना तडवी, माया तायडे, अलका बोरदे, चंद्रशेखर पाटील, आरोग्य सेविका पल्लवी भारंबे, आरोग्य सेवक विलास महाजन सह गावतील सर्व आशा स्वयंसेविका, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस उपस्थित होत्या मोठ्या उत्साहात गावात क्षयरोग संर्दभात जनजागृती करीत जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला


