रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) (Gate Taluka Raver) रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेनंतर मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील मेहुणच्या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 26 रात्रीच्या सुमारास घडला. ओम प्रकाश ढिवर (वय 21, मेहुणे, ता. मुक्ताईनगर) असे मयताचे नाव असून अपघात प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. दरम्यान, नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.[ads id="ads2"]
गाते रेल्वे स्थानकाजवळ अपघात
Muktaianagar तालुक्यातील मेहुण येथील ओम प्रकाश ढिवर (21) हा शनिवार, 26 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील शिरागड येथून बहिणीच्या घरून मेहुण जात असताना गाते रेल्वे (Gate Railway Station) स्टेशनजवळील इस्सार पेट्रोल पंपाजवळ अपघात होवून त्यात तरुणाचा मृत्यू झाला. रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) डॉ.अनिकेत चव्हाण यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.



