दि.28 मार्च ला छाननी,तर दि.12 एप्रिल पर्यंत माघार
यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील किनगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली अर्ज दाखल करण्याच्या दि.25 शेवटच्या दिवशी एकुण 24अर्ज दाखल केले गेलेत. [ads id="ads1"]
Bसोसायटीच्या 8 जनरल जागेकरीता 17 नामांकन दाखल केले आहेत.ओबीसी1जागे करीता 2 नामांकन,महिला राखीव 2जागेकरीता 2, अनुसूचित जाती जमाती1जागे करीता 1अर्ज,भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून 1जागेकरीता 2 अर्ज,असे एकूण 13 जागेसाठी 24 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.[ads id="ads2"]
28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी,तर12 एप्रिल माघार आहे.किनगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था आहे.634मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असुन निवडणूक बिनविरोध होईल की मतदान?याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एम.पी.भारंबे काम पाहत आहेत.



