अंतुर्ली खुर्द येथील ५२ वर्षीय इसमाचा सर्प दंशाने मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील एका ५२ वर्षीय इसमाचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. [ads id="ads1"] 
  याबाबत सविस्तर वृत्त असे की,पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील रहिवाशी गोपाल हारसिंग पाटील (वय - ५२ ) पाचोरा प्रतिनिधी हे दि. २५ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतात जात असतांना त्यांना एका विषारी जातीच्या सर्पाने दंश केला. काही कळण्याच्या आत गोपाल पाटील हे बेशुद्ध पडले. [ads id="ads2"] 
  त्यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. 
घटने प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक हे करित आहे. गोपाल पाटील यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!