यावल शहरात विकसित भागात मोकाट डुकरांचा धुमाकूळ ; नगरपालिकेत दाखल तक्रारीकडे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
यावल शहरात विकसित भागात मोकाट डुकरांचा धुमाकूळ ; नगरपालिकेत दाखल तक्रारीकडे दुर्लक्ष

यावल (सुरेश पाटील) यावल नगर परिषद हद्दीतील विकसित भागात सर्व कॉलनी मध्ये मोकाट डुकरांमुळे रहिवासी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आहेत याबाबत यावल शहरातील विकसित भागातील 11ते12 कार्यकर्त्यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि.24 मार्च 2022 रोजी लेखी तक्रार करून मोकाट डुकरांची विल्हेवाट लावावी अशी मागणी केली परंतु यावल नगरपरिषदेने गेल्या दोन दिवसात अद्याप कोणतीही कार्यवाही न केल्याने संपूर्ण यावल शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"] 

         मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,यावल नगरपरिषद हद्दीत असलेल्या आयेशानगर,गणपती नगर,फातेमा मस्जिद परिसर,गंगा नगर,तिरुपती नगर,प्रभू लीला नगर,फालक नगर,चांद नगर वासुदेव नगर,श्री स्वामीनारायण मंदिर परिसर इत्यादी परिसरात मोकाट डुकरांच्या मोठ्या वाढत्या संख्येमुळे रहिवासी नागरिकांना त्रास होत आहे.[ads id="ads2"] 

  मोकाट डुकरे मंदिर मज्जिद व राहते घरा मधे घुसून नासधूस करीत आहेत यामुळे विटंबना होत असून वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा :- दुचाकीची वॉशिंग करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू ; जळगावातील बी.जे.मार्केट परिसरातील घटना

हेही वाचा :- अंतुर्ली खुर्द येथील ५२ वर्षीय इसमाचा सर्प दंशाने मृत्यू 

 तरी नगरपालिका नगरपंचायत औद्योगीक नगर सन 1965 चे कलम 294 कलम 1,2,3 नुसार तत्काळ अंमलबजावणी करून यावल शहरातील प्रत्येक भागामध्ये व आयेशा नगर गणपती नगर वरील सर्व भागात डुकरांचा वाढलेला धुमाकूळ हैदोस याची विल्हेवाट लावावी अशी लेखी तक्रार करून कारवाईची मागणी अशपाक शहा अब्दुल गफ्फार शहा,हाजी शेख सादिक,शेख जुबेर,वसिम पटेल,शेख नजीब,आमिर शेख आमीन,सरफराजोद्दिन,आसिफखान, शेख कमालोद्दीन अमिनोद्दिन,शोएब खान,हाफिज खान रऊफखान,अजित पटेल गणी पटेल यांनी आपली स्वाक्षरी करून केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!