धरणगाव येथील मतिमंद विद्यालयात दिशा प्रोजेक्ट द्वारे घेण्यात आला आढावा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जयपाल राठोड यांची शाळेला सदिच्छा भेट

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगांव -  दि. २५/०३/२०२२  दिव्यांग आयुक्तालय व जयवकिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिशा प्रकल्प राबविण्यात येतो. या प्रकल्पाद्वारे दिव्यांग मतिमंद प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविण्यात येतो त्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक मतिमंद प्रवर्गातील विशेष शाळेंचा आढावा घेण्यात येत आहे. [ads id="ads1"] 

  त्याच निर्देशानुसार जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,मतिमंद निवासी अनिवासी विद्यालय धरणगाव ता.धरणगाव जिल्हा जळगाव येथे नाशिक विभागीय समन्वयक जयपाल राठोड यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. भेटी प्रसंगी संस्थेच्या वतीने मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील सरांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन तर विद्यालयाच्या वतीने मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक  ऋषिकेश जाधव सर यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.[ads id="ads2"] 

   तसेच संस्थेची दिनदर्शिका प्रदान करण्यात आली. तद्नंतर राठोड सरांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला तसेच दिशा अभ्यासक्रम कशा पद्धतीने राबवला जातो त्याची पाहणी केली, पाठ निरीक्षण केले व अभ्यासक्रम राबवत असतांना काय बदल करावेत तशा सुचना दिल्या.

       राठोड सरांनी विद्यालयाच्या ऑडिओ -व्हिज्युअल हॉल मध्ये प्रोजेक्टर द्वारे दिशा पोर्टल वर कशी माहिती भरावी, शिक्षकांसाठी मन्युअल कसे महत्वाचे आहे, शिक्षकांनी ऑनलाईन-ऑफलाइन वेळापत्रक नियोजन कसे करावे, विद्यार्थींचे वर्कबुक , रिपोर्ट कार्ड कशा पद्धतीने भरावे, डोमेन (धैय) व गोल (लक्ष) यांचें महत्व विशद केले व तसेच भाषिक व कार्यात्मक कौशल्य विषयावर सर्व विशेष शिक्षकांना प्रशिक्षण दिले व विद्यालयाच्या कार्यास पुढिल वाटचालीसाठि शुभेच्छा दिल्या. ह्या प्रसंगी सर्व विशेष शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!