रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग (Sahastraling) येथे घराच्या बाजुला मोटार सायकल का लावली या कारणावरुन सहस्रलिंग येथे तूफान हाणामारी झाली. रावेर पोलिस (Raver Police) ठाण्यात नऊ जणांविरोधात दंगलीचा (Riot) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]
याबाबत वृत्त असे की घराच्या बाजुला मोटर सायकल का लावली या कारणा वरुन सहस्रलिंग (Sahastrling) येथे तूफान हानामारी काल दि.११ मार्च शुक्रवार रोजी रात्री झाली.यामुळे सुनिल जाधव वय २३ रा सहस्त्रलिंग यांच्या फिर्यादी वरुन आरोपी सताब मोहीते, यशवंत मोहीते, हरदेव मोहीते,तिघे रा सहस्त्रलिंग तसेच हजाब मोहीते, शाणु मोहीते, बसुदेव मोहीते रा. लालमाती (Lalmati) तसेच सुभाष बेलदार, संतोष बेलदार, संतोष चव्हाण रा. नेपानगर (Nepanagar,Madhya Pradesh) या नऊ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर घटनेचा पुढील रावेर पोलिस निरीक्षक कैलास नागरे (Raver Police Station PI Kailas Nagare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ महेबुब तडवी तपास करीत आहे.

