निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये ग्रामसुरक्षा पथकांच्या कार्डाचे वितरण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये नुकतेच युवा तरुणांना ग्रामसुरक्षा पथकाचे सदस्य बनवून कार्डाचे वितरण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या सहीनिशी या कार्डांचे वितरण एपीआय गणेश धुमाळ साहेब यांनी तरुणांना केले.[ads id="ads1"] 

  यावेळी पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील गोपनीय शाखेचे स्वप्नील पाटील पो.ना. ईश्वर चव्हाण महाराष्ट्र पोलीस मित्र समितीचे सदस्य परमानंद शेलोडे होमगार्ड विलास कोळी कार्ड वितरित केलेले तरुण भवन बोरले रवींद्र बारी अक्षय दोडके परविन बारी ऋतिक मोरे निलेश बराटे हिमांशू चौधरी हे उपस्थित होते.[ads id="ads2"] 


जिल्ह्यातील वाढते गुन्हे लक्षात घेत पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीतील संपूर्ण २९ गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. यात ४०६ ग्राम सुरक्षा सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. याबाबत निंभोरा पोलिस स्टेशन येथे १० रोजी पोलिस पाटील व ग्रामसुरक्षा पथकाच्या सदस्यांची बैठक झाली. त्यात गावात गस्त घालणे, छोट्या मोठ्या चोऱ्या, शेतमालाच्या चोऱ्या थांबविण्याकरिता रात्री गस्त घालणे यांसह सण उत्सव, अपघाताचे वेळी पोलिसांना मदत करणे या बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.

सदस्यांना कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर, निंभोरा पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, डिगंबर चौधरी तंतमुक्ती समिती अध्यक्ष, प्रल्हाद बोंडे यांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस पाटील यांच्यासह ग्राम सुरक्षा पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम सुरक्षा पथक स्थापन करणे कामी पोलिस नाईक स्वप्नील पाटील, होमगार्ड अमोल अंजनसोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!